अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१३

गेले वर्ष भर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते आपले संमेलन मोठ्या दिमाखात पार पडले. आपल्या प्रत्येकाच्या मनात संमेलनाविषयी काहीतरी प्रतिक्रिया असणारच. मराठी मंडळाचे भविष्यातील कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी ह्या प्रतिक्रियांचा उपयोग व्हावा हाच एकमेव उद्देश.

आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी

  • आकाशवाणी सिडनी ने येत्या रविवारी ७ एप्रिल रोजी ११ वाजता  विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. सिडनी डायरी नंतर आपण 97470577 या नंबर वर फोन करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपण आपल्या नावाचा उल्लेख केलाच पाहिजे असे बंधन नाही. पण आपल्या प्रतिक्रियेत कोणत्याही अन्य  नावाचा उल्लेख होणार नाही याची काळजी घ्यावी. आपली प्रतिक्रिया मोजक्या वाक्यात असावी म्हणजे जास्तीत जास्त प्रतिक्रिया आपणास एकता येतील.  आकाशवाणी कार्यक्रमा संदर्भात अधिक माहितीसाठी हेमचंद्र सूर्यवंशी ह्यांच्याशी संपर्क साधावा
  •  ’ओन्लाइन सर्वे फॉर्म ’ भरून आपले मत मांडू शकता. कृपया खालील लिंकवर क्लिक करा.आपण अनामिक राहू शकता. MASI – Akhil Australia Marathi Sammelan 2013 Post Event Feedback

DVD

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातील आपल्या सहभागाबद्दल संमेलन कमिटी आपली ऋणी आहे. संमेलन यशस्वी झाल्यावर कार्यक्रमाची DVD घ्याविशी वाटणे साहजिकच आहे तर ती आता उपलब्ध होते आहे.
किमत आहे Full set $55 , Highlights $17.

DVD चे पैसे कॅश ने भरावयाचे आहेत. संमेलनाच्या Account ला पैसे transfer करू नये

त्याकरता संपर्क साधा नितीन चौधरी ह्यांना 0433 444 822 वर किंवा स्वरदा निजामपूरकर ह्यांना 0431 785 265 वर.