अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६ – संवाद ५

नमस्कार बंधू एवं भगिनी ,

मेलबोर्न मध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनासाठी वेगवेगळ्या स्तंभांच्या अंतर्गत कार्यक्रम आखत आहोत हे आधीच्या संवादातून आपणास कळवले आहेच.

ह्या प्रत्येक स्तंभातील विषयाला धरुन भारतातील निमंत्रितानमध्ये खालील मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. Dr. श्री प्रकाश व सौ आमटे , पेंडचे प्रसिध्द मूर्तिकार श्री देवधर , प्रसिध्द नाटककार श्री शरद पोंक्षे, संत वाङमय व इतिहास तज्ञ प्राध्यापक श्री सदानंद मोरे , प्रसिध्द नाटक “गोष्ट तशि गंमतीची”…….इ……
आतापर्यंत झालेल्या ऑस्ट्रेलियातील सर्व संमेलनात ऑस्ट्रेलियातल्या वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःचे कार्यक्रम सादर केलेले आहेत. अश्या राज्यांच्या आधारावर मर्यादित वेळेत कोणालाही नाराज न होऊ देता कार्यक्रमाचे नियोजन करणे म्हणजे संयोजकांची नेहेमीच तारेवरची कसरत असते.

यंदाच्या मेलबोर्न मधील संमेलनात करमणुकीचे कार्यक्रम ​प्रत्येक​ राज्याचे स्वतंत्र न करता एकत्र गुंफून करण्याचा आमचा विचार आहे.
ह्याचा समन्वय प्रत्येक राज्यांच्या अध्यक्षांच्या मार्फत केला जाईल. आपण ह्या वेगळ्या प्रयत्नाला नक्कीच सहकार्य कराल अशी खात्री बाळगतो.

ऑस्ट्रेलियातील स्थानिक कलाकारांच्या मुख्य कार्यक्रमाबद्दल खाली सविस्तर माहिती देत आहोत.

१. स्वागता प्रित्यर्थ सोहोळ्याचे आयोजन व संपूर्ण सहभाग हा यजमान राज्याचा ( मेलबोर्न , Victoria ) असेल.

२. सुगम संगीताचा कार्यक्रम : सर्व ऑस्ट्रेलियातील कलाकारांचा एकत्र कार्यक्रम, एकत्र वाद्यवृंद , भक्ती किंवा प्रीतीवर वर आधारित गाणी. एकूण १७ गाण्यांच्या संख्यांची ढोबळ मानाने विभागणी अशी:
सिडने (NSW) – ६ , मेलबोर्न (Victoria) – ४ , अडीलेड (SA) ​- ३ ​/ ब्रिसबेन (QLD) / पर्थ (WA) – प्रत्येकी – २. – प्रत्येक राज्यातील मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या coordinator चे नाव मेलबोर्नचे coordinator ​( श्री शिरीष बागुल – bagul@optusnet.com.au ) ​ह्यांना गाण्यांचा सराव सुरु करण्या पूर्वी ५ ऑक्टोबर पर्यंत कळवावे.

३. नृत्य : विविध प्रकारची महाराष्ट्रातील रूढी किंवा परंपरेवर आधारीत ​समूह ​लोक ​​नृत्ये ( कमीतकमी ८ कलाकारांचा सहभाग )​​ उदा: कोळी नृत्य , ​शेतकरी ​​नृत्य , ​गोंधळ, लावणी इ…. (बॉलीवूड नव्हे). सर्व राज्यांची मिळून संख्या ५ आणि वेळ मर्यादा प्रत्येकी ८ – १० मिनिटे. -​ प्रत्येक राज्यातील मंडळाच्या अध्यक्षांच्या मार्फत प्रवेशिका ५ ऑक्टोबर पर्यंत coordinator ( श्री शिरीष बागुल – bagul@optusnet.com.au ) कडे पाठवाव्यात .

४. एकांकिका : सिडने​ ​/​ ​मेलबोर्न​ ​/​ ​अडीलेड​ ​ मधील कलाकारांना प्रत्येकी एक अशी करमणूक प्रधान एकांकिका सादर करण्याची संधी मिळेल. वेळ मर्यादा प्रत्येकी २५ -३० मिनिटे. वेळेचे महत्व लक्ष्यात घेवून कमीतकमी Stage तयारीने एकांकिका सादर करता येईल अशी निवडावी. एकांकिकेचे नाव व SCRIPT आपल्या मंडळाच्या अध्यक्षांच्या मार्फत प्रवेशिका ५ ऑक्टोबर पर्यंत coordinator (श्री शिरीष बागुल – bagul@optusnet.com.au )कडे पाठवाव्यात .

५. कथाकथन : एकूण ४ कथा – वेळ मर्यादा – प्रत्येकी १० मिनिटे.​ ​ आपण निवडलेली कथा, नाव व लेखक या सकट audio clip – MP ३ FORMAT मध्ये प्रवेशिका ५ ऑक्टोबर पर्यंत थेट coordinator ( श्री शिरीष बागुल – bagul@optusnet.com.au ) कडे पाठवाव्यात . व्यक्तिगत प्रतिभेला या सदरामधून आवाहन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्या नंतर आवश्यकता भासल्यास स्वतंत्र Judges कडून ४ निवडक कथा रंगमंच्यावर सादर करण्यासाठी निवडण्यात येतील.

प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा आस्वाद व स्थानिक दर्जेदार कलाकारांना संधी, हे ह्या संमेलनाचे दोन मुख्य हेतू असून , वेळेची मर्यादा राखून हे संमेलन एक सुखद अनुभव म्हणुन लक्षात राहावे हा प्रामाणिक प्रयत्न ह्या संमेलनात करण्यात येत आहे.

वरील कार्यक्रम सोडून इतर आणखीन काही कार्यक्रमासाठी संधी निर्माण झाल्यास निश्चितच कळविण्यात येईल.

प्रवेशिका पाठविण्याची तारीख ५ ऑक्टोबर २०१५ आहे ह्याची नोंद घ्यावी.

स्नेहांकित

अभिजीत भिडे
संयोजक
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०१६
+६१ ४०२ ०८१ १९३

Dear Brothers and Sisters Namaskar,

We have already emailed details of various segments of Sammelan 2016, in our last Samwad.

We are pleased to announce few BIG NAMES from Bharat related to these segments who are among the list of Invitees for AAMS 2016. They are as under

Dr. Prakash and Mrs. Amte , Shri Sharad Ponkshe, Shri Deodhar ( famous Ganesh Murtikar from Pen ), Famous drama “Goshta Tashi Gamtichi” and many more……….

It has always been a great challenge to provide enough time to each State (City ) individually for their performances in Kala and Manoranjan and at the same time, keep everyone happy.

The very purpose of this Sammelan is to invite and enjoy the outstanding talent available in Bharat through their performances which we ALL Australian MARATHI people look forward to for every three years along with providing platform / opportunities to worthy and deserving LOCAL MARATHI talent across Australia.

Keeping this in mind, it has been decided to have collective participation of all Cities (States) through various elements which will form part of Kala and Manoranjan Segment. Also it has been decided that the President of each Mandal will be the single point of contact for obtaining expression of interests within each Mandal and will coordinate with coordinator in Melbourne, Shri Shirish Bagul (bagul@optusnet.com.au ).

The various elements are

1. The first entertainment show just after the opening ceremony will have full participation from the host city only i.e. All Performers from Melbourne.

2. Light Music : Combined Program including participants from all States to present around 17 songs with split as under
Sydney – 6 songs / Melbourne – 4 Songs / Adelaide – 3 Songs and Brisbane / Perth – 2 songs each. Each President to nominate coordinator within the respective Mandals and that coordinator will get in touch with Shri Shirish Bagul in Melbourne. The list with names of singers and songs to be submitted by 5th October 2015.

3. Dances : Folk / Traditional dances such as Koli dance, Shetkari Dance, Lavni, Gondhal , ( Bollywood to be avoided )….etc Minimum participants 8 in each dance. Total dances – 5. Time allowed – 8 to 10 min each. President of each Mandal to send entries to Melbourne Coordinator by 5th Oct 2015.

4. One act Play (Ekankika) : Sydney / Melbourne / Adelaide to present Ekankika with a time slot of 25 to 30 max. The subject should be entertaining with minimum stage requirements. Please send script and name other details to Melbourne Coordinator through each Mandal’s President.

5. Story Telling (Kathakathan) : Total four Stories – time slot – 10 to 12 min Max. Please send entries with name, script, audio tape – MP3 directly to Shri Shirish Bagul, the coordinator in Melbourne (bagul@optusnet.com.au )

As you would realize, the Sammelan is only for three days ! and there is a necessity to strike balance of providing justice to deserving local talent at the same time rejoicing the exceptional overseas talent and take away the pleasant memories out of Sammelan.

We humbly request your whole hearted cooperation and support…..

Warm Regards

Abhijit Bhide
Convener
Akhil Australia Marathi Sammelan 2016
+61 402 081 193